अखेर नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवरील आणखी दोघांविरोधात जबाब नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातला होता. तिच्या जबाबानंतर या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

वकील अ‍ॅड. नितीन सातपुते आणि त्यांच्या आणखी एका वकील सहकाऱ्यासह तनुश्री सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहोचली. मीडियाला टाळण्यासाठी तिने बुरखा परिधान केला होता. गेले दोन दिवस तिचा जबाब नोंदविण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. तनुश्रीने पोलीस ठाण्यात जबाब दिला. त्यात नाना पाटेकर आणि आचार्य यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग तसेच निर्माता सामी सिध्दिकी यांच्यावरही आरोप केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*