‘आशिक बनाया आपने’ फेम अभिनेत्री बिग बॉसच्या घरात ?

0
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानने बिग बॉसच्या १२ व्या सिझनची घोषणा नुकतीच केली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्याने सांगितले कि, हा सिझन कपल मध्ये रंगणार आहे. त्यामुळे आता या सिझनमध्ये कोण कोण दिसणार यावरून सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये हॉट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली तसेच आशिक बनाया आपने सॉंग फेम अभिनेत्री ‘तनुश्री दत्ता’ देखील या बिग बॉसच्या घऱात जाणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक दिवसापासून सिनेमांपासून दूर असलेली बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अनेक फिल्म मध्ये अभिनय केला आहे. आशिक बनाया आपने’, ढोल, रकीब, चॉकलेट, रामा द सेवियर अशा चित्रपटांत झळकलेली तनुश्री ही तिची बहिण इशिता दत्तासोबत या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा बिटाऊनमध्ये रंगली आहे. इशिता ही देखील अभिनेत्री असून काही दिवसांपूर्वी ती कपिल शर्माच्या फिरंगी चित्रपटात दिसली होती.

याबाबत तनुश्री म्हणाली कि, या शोबाबत अद्याप आपण विचार केला नसल्याचे सांगितले. ‘मला गेली अनेक वर्षे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप मी विचार केलेला नाही’ असे तनुश्रीने सांगितले.

LEAVE A REPLY

*