तंटामुक्ती समित्या आणि पोलीस पाटील उरले नावापुरते

0

अनेक गावांमध्ये अवैध धंदे, दारू, जुगारांच्या प्रमाणात वाढ

खिर्डी (वार्ताहर) – गावपतळीवर निर्माण होणारे वाद तंटे कमी करून तिथे सामाजिक सलोखा अबाधित राखणे हे काम तंटामुक्ती समितीचे आणि गावातील पोलीस पाटील यांचे असते, मात्र ही मोहीम सध्या बाजूलाच पडली आहे. त्यामुळे गावा गावात अवैध धंद्यानी कळस गाठला असून याकडे पोलीस प्रशासन आणि तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावागावातील नागरिकांकडून होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्ती समित्यांनी आणि पोलीस पाटलांनी सुरुवातीच्या काळात चांगली कामगिरी करुन पुरस्कार प्राप्त केले होते, परंतु मागील काही वर्षांपासून ही चळवळ थंडावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तंटामुक्ती समित्या आणि पोलीस पाटील नावालाच राहिले आहेत.
गावा पातळीवरील अनेक तंटे पोलीस ठाण्यामध्ये येते आहेत. यात बीट जमादार दोन्ही पक्षांकडून आपले हेतू साध्य करुन घेत आहे. पोलीस पाटलांनी आपल्या गावातील अवैध धंद्याना मूक संमती दिली असल्याचे दिसून येते आहे. गावा पातळीवर तंटामुक्ती समितीचे गठण करुन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची नेमणुक केली जाते, परंतू या समितीला मार्गदर्शक म्हणून तालुकास्तरीय तंटामुक्ती समितीने मार्गदर्शन करण्याची गरज असते.

तथापी यासाठी आवश्यक असलेल्या बैठका तालुका पातळीवर होत नाहीत. यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती तालुका समिती अध्यक्ष तहसीलदार व नियंत्रक सचिव, पोलीस निरीक्षक यांनी वेळोवेळी या समित्यांना मार्गदर्शन करणे गरजचे असतंना याकडे सर्वाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे गावागावामध्ये अनेक अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणावर कळस गाठला आहे.

  देशी दारूची दुकाने, गुटखा, जुगार, पेट्ोल विक्री, मावा, गौण खनिज चोरी, अशा पध्दतीचे अवैध व्यवसाय सध्या मोठया प्रमाणावर गाव पातळीवर सुरू असल्याचे चित्र दिसून येते आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस प्रशासन, गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलस पाटील यांची आहे; परंतु मात्र या गोष्टी कोणी लक्ष देत नसल्याचे आरोप गावा गावातील नागरिकांकडून होत आहेत.

LEAVE A REPLY

*