साऊथ एशियन स्पर्धेत तन्मयीला 2 सुवर्ण

0

भूतान येथे मागील महिन्यात झालेल्या चौथ्या साऊथ एशियन स्पर्धेत जम्परोप क्रीडाप्रकारात 2 सुवर्ण व 1 कास्यंपदक पटकावून तन्मयी यादवने पुन्हा एकदा नाशिकचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर चमकवले आहे.

तन्मयीच्या आतापर्यंतच्या कामगीरीच्या आधारावर ऑगस्टमध्ये हॉगकॉग येथे होणार्‍या एशिया पॅसिफीक स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. याशिवाय तन्मयीने विविध राष्ट्रीय स्पर्धामधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. साऊथ एशियन स्पर्धेतील अनुभव आणि हॉगकॉग येथील होणार्‍या पॅसिफीक स्पर्धेविषयी तन्मयीने ‘देशदूत’शी साधलेला हा संवाद.

क्रीडा विषयाची लहानपणापासून आवड आहे. त्यामुळे शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेेमध्ये मी नेहमीच सहभागी होत असत. सुरवातीला मैत्रिणींबरोबर सर्व खेळ खेळत असत, नंतर मात्र जम्परोपविषयी आवड निर्माण झाली आणि मी त्याकडे अधिक लक्ष देवू लागले. या खेळाच्या सरावाबरोबर शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही सुरू केले.

सध्या एम. एस. कोठारी अ‍ॅकॅडमीत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. क्रीडा क्षेत्राविषयी कोणतीही पार्श्वभूमि नसताना केवळ इच्छाशक्ती आणि कौटुबिक सहकार्यामुळे मी आंतराष्ट्रीय पातळीपर्यंंत मजल मारु शकले. नियमित सराव व क्रीडा प्रशिक्षण चिन्मय देशपांडे, तन्मय कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू केली. सुरवातील शालेय स्तरावर खेळता-खेळता पुढे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

जम्मु-काश्मीर येथे फेब्रुवारी 2016 ला झालेल्या झालेल्या टेनिंग कॅम्पमध्ये मी सहभागी झाले होते. त्यानंतर शिरपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धेत 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवले. गाझियाबाद येथील राष्ट्रीय स्पर्धेत 1 रौप्य व 1 कांस्य पदकाची कमाई केली. तसेच पाँडेचरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण पदके मिळवली. याशिवाय कर्नाटक, भूतान येथे झालेल्या स्पर्धेतून मी 9 सुवर्ण, 5 रजत, 6 कांस्य पदकांची कमाई केली.

यासाठी शहरातील जैन सोशल ट्रस्ट, कालिका मंदिर ट्रस्ट व क्रीडासाधनातर्फे राष्ट्रीय खेळाडून पुरस्कार देवून गौरवण्यात आले. आई-वडीलांबरोबरच क्रीडाशिक्षक चिन्मय देशपांडे, अशाक दुधारे, विक्रम दुधारे व सहकारी खेळाडूंचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्रीडा क्षेत्राला सध्या चांगले दिवस येत असून नाशिकमध्येही चांगलीच जागृती होत आहे. त्यामुळे बर्‍याच खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्यास आता प्रारंभ झाला आहे. पुर्वी बर्‍याच खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी जावे लागत असत. आता जनजागृती आणि पालकांबरोबर मुलांच्याही वाढत्या संख्येमुळे अनेक क्रीडा संस्थाकडून विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे.

याचा परिणाम म्हणून मागील वर्षी रिओ येथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेमध्ये नाशिकच्या 2 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला अधिक झळाळी मिळाली असून यापुढी ही संख्या वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. त्यामुळे आमच्यासारख्या नवीन खेळाडूंनाही प्रेरणा मिळत आहे. जागृती वाढत असली तरी शासकीय पातळीवरूनही

LEAVE A REPLY

*