Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘समुद्र किनारी स्वच्छता अभियान

Share

तामिळनाडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू येथील महाबलीपूरम येथे समुद्र किनारी स्वच्छता केली आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

दरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यात आज महाबलीपूरम येथे बैठक आहे. यावेळी सकाळी फेरफटका मारण्यासाठी पंतप्रधान मोदी समुद्रकिनारी गेले असता त्यांनी येथे ३० मिनिटे स्वच्छता केली. दरम्यानचा एक व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केले आहे.

व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी लिहिले की, ‘आज सकाळी महाबलीपूरम मधील समुद्रकिनाऱ्यावर अर्धा तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. समुद्रकिनार्‍यावर आलेला कचरा, पाण्याच्या बॉटल्स गोळा करून येथील हॉटेल स्टाफ जयराज यांच्याकडे देण्यात आला. प्रत्येकाने आपल्या घराजवळ स्वच्छता ठेवली पाहिजे. यामुळे आपण सर्व जण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!