Type to search

पेट्रोलचे दर विचारणाऱ्यास भाजप नेत्याची मारहाण

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पेट्रोलचे दर विचारणाऱ्यास भाजप नेत्याची मारहाण

Share
चेन्नई : इंधन दर कमी करणे सरकारच्या हातात नाही, असं सांगत दरवाढीसंबंधी हात वर करणाऱ्या भाजपचे हात आता पेट्रोलचे दर विचारणाऱ्यावर उचलले जावू लागले आहेत. तामिळनाडूमध्ये एका रिक्षाचालकाने पेट्रोलच्या दरावर प्रश्न उपस्थित करताच त्याला भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सध्या गणपती उत्सव सुरू आहे. गणपती चतुर्थीच्या कार्यक्रमास तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन या उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षाचालक साईदापेट यांनी ‘ताई, पेट्रोलचे दर खूप वाढत आहेत’, असे म्हटले. यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला धक्काबुक्की करीत मारहाण केली तसेच त्याला या कार्यक्रमातून हाकलून लावले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!