प्रश्नाचे उत्तर न देता राज्यपालांनी महिला पत्रकाराच्या गालाला लावला हात

0
चेन्नई: महिला पत्रकाराने राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र, उत्तर देण्याचे टाळून तिच्या गालाला हात लावला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. आधीच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या या कृतीबाबत संताप व्यक्त होत आहे.तामिळनाडूत सेक्स फॉर डिग्री प्रकरण गाजत आहे.
त्यातच राजपालांनी असे कृत्य केल्याने वाद अधिकच चिघळलाय. द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार कनिमोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला. राज्यपालांनी आपल्या मर्यादा समजायल्या हव्यात. त्यांनी महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला आहे. त्यांनी तिचा सन्मान राखलेला नाही, असे म्हटलेय.

सेक्स फॉर डिग्री प्रकरणामुळे तामिळनाडूत एकच खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आणि याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्यानं तामिळनाडूत एकच खळबळ उडाली. त्यामुळेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र या परिषदेत त्यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. त्यामुळे पुरोहित पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

सेक्स फॉर डिग्री प्रकरण
सेक्स फॉर डिग्री प्रकरण सध्या गाजत आहे. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी ‘संबंध’ ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिकेने चार विद्यार्थिनींना दिली होती. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.या प्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्याने तामिळनाडूत वातावरण तप्त आहे. त्यातच पत्रकार परिषदेनंतरचा हा प्रकार पुढे आल्याने त्यात अधिक भर पडली आहे.

LEAVE A REPLY

*