भाजपच्या विजयानंतर तमिळ अभिनेता प्रकाश राज सापडले कचाट्यात

0
नवी दिल्ली : नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये भाजपाने मुसंडी मारत मोठा विजय प्राप्त केला आहे. देशात भाजपचीच लाट असल्याचं यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सोशल मीडियावर कर्नाटक निवडणूक निकालांच्या निमित्ताने अभिनेता प्रकाश राज यांनी वक्तव्य केले होते. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कानडी जनतेने भाजपला मतं देऊ नये असं आवाहन प्रकाश राज यांनी केलं होतं. इतकंच नव्हे तर यादरम्यान त्यांची पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुद्दाही उचलून धरला होता. परंतु भाजपच्या विजयानंतर प्रकाश राज चांगलेच कचाट्यात सापडले आहे.

भाजपला कर्नाटक निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येणार नाही याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण, आता मात्र ते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकाश राज आता कुठे लपून बसले आहेत, ‘कोणीतरी त्यांना शोधा’, अशा आशयाचे ट्विट केले नेटकऱ्यांनी आहेत.

LEAVE A REPLY

*