तळोदा शहरातील पहिल्या अभिनव उद्यानाचे लवकरच लोकार्पण

0
मोदलपाडा । वार्ताहर – तळोदा शहरातील एकमेव उद्यानाचे काम पूर्ण झाले असून आता हे उद्यान लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. लवकरच लोकार्पण होणार असल्याचे नगराध्यक्षा सौ.रत्ना सुभाष चौधरी यांनी सांगितले.
तळोदा शहरातील एकमेव असे उद्यान पालिकेच्या माध्यमातून काम सुरु असून लवकरच हे काम पूर्णत्वास आले आहे. तळोदेकर जनतेसाठी आता हक्काचे हिरवेगार असे एकमेव पहिलंवहिलं उद्यान असणार आहे.

येथील विमलनगर या नवीन वसाहतीत गो.हू.महाजन शाळेला लागून असलेल्या या उद्यानाचे काम पालिकेने सौ. रत्ना सुभाष चौधरी यांनी हाती घेतले होते.

या ठिकाणी आता उद्यानातील काँक्रिटिकरण व संरक्षक भिंतीचे काम, मधील वृक्ष व हिरवीगार गवताची बिछायत यांचे काम उशिरा का होईना अखेर सुरू झाले आहे. या उद्यानात लहान मुलासाठी क्रीडा साहित्य व खेळणी ठेवण्याचे कामदेखील झाले आहे.

तळोदा शहरातील एकमेव उद्यान
तळोदा शहरात साधारण 30 वर्षापूर्वी शहादा रस्त्यावर वनविभागाचा मेवासी कायार्लय आवारात छोटेसे उद्यान होते. मात्र त्या ठिकाणी सीसॉ, व लोखंडी पाळण्यांव्यतिरिक्त काहीही नव्हते.

त्यावेळी शहराचा विकास नवीन वसाहतीत एवढा झाला नसल्याने शहरापासून लांब असल्याने जास्त कोणी फिरकत नव्हते.

मात्र, आता नवीन तयार होत असलेले उद्यान हे बसस्थानकाजवळ व चिनोदा रस्त्यावर असल्याने अतिशय मध्यभागी असल्याने इथे निश्चित सायंकाळी गर्दी फुलल्याशिवाय राहणार नाही.

असे आहे उद्यान
ही जागा मोक्याची असून यात काँक्रीटची भिंत चारही बाजूला असून याला दोन प्रवेशद्वार असणार आहेत.

जेष्ठ नागरिकांसाठी सकाळी व सायंकाळी पायी फिरण्यासाठी काँक्रीटचे पथ असणार आहेत. तसेच लहान मुलासाठी घसरगुंडी, छोटे झुले, सीसॉ व खेळणी असणार आहेत.

उद्यानाचा मध्यभागी पाण्याचे भलेमोठे कारंजे असणार आहेत. एकंदरीत पाहता हे उद्यान तळोदेकर जनतेसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरेल यात शंका नाही.

 

LEAVE A REPLY

*