Type to search

Featured सार्वमत

तलाठी व मंडलाधिकार्‍यांच्या कारभारात सावळागोंधळ

Share

तक्रारी न बघताच फेरफारीच्या नोंदी, कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची वेळ

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – आयुष्यात प्रत्येकाचा संबंध कधी ना कधी गावचा कामगार तलाठी आंणि मंडलधिकारी यांच्या बरोबर येतो आणि या कार्यलयाच्या कारभाराचा अनुभव येतो असाच अनुभव सध्या श्रीगोंदा तलाठी आणि मंडलधिकारी यांचा येतो असून ज्याचा असेल दाब त्याचेच होईल काम असे करताना फेरफार नोंदी बाबत कुठलीच कागद पत्र न पाहता आणि शेतकर्‍यांच्या तक्रारीना केराची टोपली दाखवत केलेल्या कामामुळे सामान्यांना फटका बसत आहे .याबाबतचा अनुभव आल्याने अगोदरच एका व्यवहारात फ़सलेल्या बापू कोथिंबिरे याना महसूल यंत्रणेचे दारे झिजवण्याची वेळ आली आहे.

‘जे नसे ललाटी ते लिखे तलाठी’ अशी ग्रामीण भागात मराठी म्हण आहे. याचा अनुभव सध्या श्रीगोंदा सजा म्हणजे शहरातील शेतकर्‍यांना येत आहे. गावचा कामगार तलाठी यांच्या मनमानी कारभारा मुळे शहरातील शेतकर्‍याना फटका बसत आहेत. सातबाराच्या सह्यासाठी तासनतास बसावे लागत आहे. अन्य दाखले तर मिळतच नाहीत. कुणाचे काम वेळेवर होत नाही. ज्याची असेल ओळख त्याचेच काम होत आहे. यापुढे जाऊन तलाठी आणि मंडलधिकारी शेतकर्‍यांनी केलेले खरेदी विक्रीचे दस्ताची, गहाण खताची फेरफार नोंद करताना कुणाचे नोंदी वेळेवर होतील याचे भरोसा राहिला नाही. मागील सहा माहिन्यपासू ज्यांची ओळख आहे. त्यांचे फेरफार मंजूर केले जात आहेत. तर ज्याची ओळख नाही त्यांचे फेरफार मंजूरच केले जात नाहीत.

अनेक फेरफार मंजूर करताना याबाबतीत आलेल्या हरकती याचा विचार न करताच नोंदी मंजूर केल्या जात आहेत.
याच बाबत अनेक शेतकरी तक्रार करत असताना शहरातील बापू नारायण कोथींबीरे या जेस्ठ शेतकरी यांनी दहा वर्षा पूर्वी एका जमीन व्यवहार केला होता मात्र हा व्यवहार पूर्ण झाला नाही नंतर मात्र त्यांच्याशी हा व्यवहार न करता अन्य व्यक्ती बरोबर जमीन व्यवहार झाला या व्यवहाराबाबतीत गाव दप्तरी नोंद करण्यास हरकत असल्याचा अर्ज कोथिंबिरे यानी वेळेत दिला मात्र या बाबतीत कोथिंबिरे यांच्या अर्जाला कराची टोपली दाखवत त्यांच्या अर्जाची दखल न घेताच केवळ एक दिवसात फेर मंजूर करत गाव दप्तरी नोंद करण्यात आली. यामुळे बापू कोथिंबिरे यांनी तलाठी आणि मंडलधिकारी यांच्या विरोधात कारवाई करावी यासाठी अर्ज जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केला आहे.

दाम करी अगोदर काम
अशाच प्रकारे गावदप्तरी नोंदी करताना तलाठी आणि मंडलाधिकारी कुठल्याच प्रकारे पाहणी न करता ज्याची ओळख असेल त्याचे काम अगोदर करत आहेत. जो अगोदर देईल दाम त्यांचे काम अगोदर केले जात आहेत. पूर्वीच्या अनेक नोंदी रखडल्या आहेत मात्र नंतर च्या नोंदी गाव दप्तरात केल्याचे दिसून आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!