Type to search

तलाठ्यांची बदली प्रक्रिया स्थगित करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

Featured सार्वमत

तलाठ्यांची बदली प्रक्रिया स्थगित करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात महसूल विभागातील सर्वात शेवटचा दुवा असणार्‍या तलाठ्यांच्या बदलीची जिल्हाधिकार्‍यांनी राबविलेली प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. स्थगित करण्यात आलेल्या बदल्यांचा फेरविचार करून स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासत घेऊन ही प्रक्रिया राबविण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्राकांत पाटील यांनी दिल्या आहेत. ना. पाटील यांनी दिलेल्या आदेशात तलाठी संवर्गाच्या नियुक्तीचे अधिकारी हे प्रांताधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्याचे अधिकार त्यांना आहेत. शासन सेवा नियमानुसार तलाठी हे पद गट ‘क’ मध्ये समावेश आहे. गट ‘क’ पदावरील बदल्यांमध्ये शासन नियम 2015 चा चुकीचा अर्थ लावून जिल्हाधिकारी कार्यालयाने या बदल्या केेल्या. 2008 मध्ये समुपदेशाने बदल्या करण्याचे धोरण घेतलेले आहे. या धोरणाकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे.

प्रशासनाचे हित आणि सार्वजनिक सेवेचे हित व कर्मचार्‍यांची सोय विचारात घेऊन बदल्या करणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासत घ्यावे असे संकेत आहेत. मात्र, तलाठ्यांच्या बदल्या करताना जिल्हाधिकार्‍यांनी हे संकेत धुडकावले आहेत. स्थानिक पातळीवर तलाठी हा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतो. तसेच टंचाईच्या काळात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तलाठी यांची बदली केल्यास स्थानिक पातळीवर समस्या वाढून त्याचा परिणाम प्रशासनावर होत आहे. चुकीच्या बदल्या केल्यामुळे लोकप्रतिनिधींसोबत कर्मचारी संघटना नाराज होत असून यामुळे तलाठ्यांच्या बदलीची जिल्हाधिकार्‍यांनी राबविलेली प्रक्रिया स्थगित करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!