Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Share
Chopada

अहमदनगर (प्रतिनिधी) – पकडलेला वाळुचा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी राहुरी तालुक्यातील लाख गावच्या तलाठ्याला 20 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. परशुराम गोरक्षनाथ सूर्यवंशी (वय- 46 सजा- लाख ता. राहुरी, रा. मुसळवाडी ता. राहुरी) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

सूर्यवंशी याने 2 ऑगस्ट 2019 रोजी एक वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. तो राहुरी तहसील कार्यालयात आणून लावला. तेव्हा पासून पकडलेला ट्रॅक्टर तहसिलच्या आवारातच उभा होता. ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी सूर्यवंशी याने ट्रॅक्टर मालकाकडे 40 हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 20 हजार रूपयांची मागणी करून टॅक्टर सोडून देण्याचे ठरले.

याबाबत ट्रॅक्टरच्या मालकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. शुक्रवारी (दि. 14) प्रवरा नदीच्या किनारी जातप गावच्या शिवारात तक्रारदार यांच्यकडून 20 हजार रूपयांची लाच घेताना सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!