Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपंधराशे रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

पंधराशे रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

नांदगाव | प्रतिनिधी 

पंधराशे रूपयांची लाच घेतांना तलाठी राजकुमार उत्तमराव देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या देशमुख याने शेतीच्या ड उताऱ्यात फेरफार करण्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच फिर्यादी कडे मागितली होती.

- Advertisement -

त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. ठरल्याप्रमाणे नांदगाव शहरातील रेल्वे फाटकाजवळ लाचेचे पंधराशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटिल, पोलिस हवालदार सुभाष हांडगे, पोलिस नाईक राजेंद्र गीते यांच्या पथकाने देशमुखला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पंधराशे रुपये हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला.

जाळ्यात आलेल्या तलाठींचे नोकरीचे अवघी चार वर्षे शिल्लक आहेत. दुसऱ्यांदा त्यांना लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे. लाचलुचपतच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या