तंत्रज्ञानाचा वापर करताना काळजी घ्या – पियुष सोमाणी

0
नाशिक । बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाताना, तंत्रज्ञानाच्या सह्याने स्पर्धेत टिकले पाहिजे. अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच ई लार्निगचा पर्याय पण निवडला पाहिजे. परंतु तंत्रज्ञानाचा वापर करतांना दुरपयोग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इ एस डी एस, सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष सोमाणी यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात आज वाणिज्य सप्ताहाचा प्रारंभ एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राने झाला. ‘रिसेंट ट्रेंड्स इन अ टीचिंग, लर्निंग, व इव्हॅल्युएशन’ या विषयावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

चर्चासत्रादरम्यान अध्यक्षस्थानावरून बोलतांना शिक्षणतज्ञ व संस्थेचे सचिव डॉ. मो.स.गोसावी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली पाहिजे. पदवी मिळाल्यावर नोकरी न करता उद्योजक बनण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तंत्रज्ञानाची कास धरून अध्ययन करा व ज्ञान अद्ययावत ठेवा असे ते म्हणाले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक आयोजक डॉ. नितीन सोनगीरकर यांनी केले.

अध्ययन अध्यापन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाचा उल्लेख केला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य साधना देशमुख चर्चासत्राच्या समन्वयक प्रा. मनीषा जोशी, प्रा. गीतांजली गीते उपस्थित होत्या. चर्चासत्राला उपप्राचार्य डॉ. मोहिनी पेटकर, डॉ.कविता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विविध महाविद्यालयातून अनेक प्राध्यापकांनी ह्या चर्चासत्रात सहभाग घेतला.

दुस-या सत्रात संघटीत क्षेत्रातील सहयोगपूर्ण कार्यात अध्ययन व अध्यापनाच्या नवीन पद्धती यावर विचारमंथन झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी सी. ए. मकरंद महादेवकर यांनी मार्गदर्शन केले . तिस-या सत्रात मूल्यमापनाच्या अनुषंगाने ई-लर्निग मधील विचार प्रवाह या विषयावर चर्चा झाली.

यावेळी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी आधुनिक युगात तंत्रस्नेही होण्याची आवशकता स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्नेहा रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेंद्र धोंड्गेपाटील व प्रा. मनीषा जोशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*