बँकॉकमधील स्पर्धेत हरसूलच्या ताई बामणेला ‘रौप्य’

0
नाशिक | जिल्ह्यातील हरसूल येथील ताई बामणे या महिला धावपटूने पुन्हा एकदा नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे.

बँकांकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. आजच्या स्पर्धेत ताईने १५०० मीटर हे अंतर ४ मिनिट २५ सेकंद आणि ६६ मिलिसेकंदात पार केले.

ताई सुवर्ण पदकापासून अवघ्या एका मिनिटाने दूर राहिली. जपानच्या युकी काणेमित्सु हिने सुवर्णपदक कमावले.

ताईच्या आजच्या यशामुळे ती आता ‘युवा ऑलिम्पिक २०१८’ या अर्जेंटिना येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

ताईच्या यशामुळे तिचे प्रशिक्षक हिरकुड सर व विजेंद्र सिंग यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*