Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र!

Share

मुंबई | प्रतिनिधी 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले कि, समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते.

हमखास व्याघ्र दर्शनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आधुनिक जगातील निसर्ग तीर्थक्षेत्र होय, अशी भावना असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे प्रतिपादन यांनी केले.

वृक्षदिंडी आणि स्वच्छता महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी माई आल्यावर त्यांनी पहिल्यांदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दिली भेट दिली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलतांना माई म्हणाल्या कि, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारताचे भूषण आणि संपूर्ण जगाचे वैभव आहे. ताडोबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प आहे. इथे असलेली वाघांची संख्या ही इतरत्र असलेल्या प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे इथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला वाघाचे दर्शन हे हमखास लाभतेच.

दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक ताडोबाला येतात, हि बाब महत्त्वाची वाटते कारण गोरगरीब तरुणांना स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळतो, त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो.

ताडोबामध्ये वाघ पहायला येणाऱ्या पर्यटकांनी उच्छाद मांडू नये,आरडा-ओरड करू नये, गोंधळ घालू नये, आपल्या कृतीतून वाघ किंवा इतर कुठल्याही वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला किंवा वनसंपदेला, जैवविविधतेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, अस आवाहन माईनी पर्यटकांना उद्देशून केले.

पर्यटकांना निसर्गाचे महत्व कळावे आणि पर्यटनाबरोबच नैसर्गिक सौदर्य अबाधीत रहावे, पर्यटकांना चांगल्या सुविधा द्याव्यात,  असे माईनी सांगितले.

राज्याचे कर्तबगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा वन विभागाला ओळख दिली आहे, आधी वन विभागाला ओळख द्यावी लागत होती.

आज वन विभागाला स्वताची स्वतंत्र ओळख सुधीरभाऊंच्या कर्तबगारीने मिळाली आहे, वन विभागाचे कार्य लोकाभिमुख झाले त्यासाठी सुधीरभाऊंनी साडेचार वर्षात जीव ओतून काम केले आहे.

हि बाब महत्त्वपूर्ण असून असा वनमंत्री होणे नाही, या शब्दात माईनी वनमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली. वाघांचे रक्षण करताना गोमातेला विसरू नका तीला आपल्या काळजात जागा दिली पाहिजे, अस माई म्हणाल्या. यावेळी चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस, शैलेंद्र बैस, ममता बालसदन पुणेचे व्यवस्थापक दीपक गायकवाड उपस्थित होते

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!