तडीपार गुंड राहुल बडगुजर त्रिमूर्ती चौकातून जेरबंद

0
नाशिक । दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार असतानाही शहरात वावरणार्‍या त्रिमुर्ती चौक येथील गुंडास शहर पोलिसांच्या युनीट 1 च्या पथकाने काल सापळा रचून जेरबंद केले.

राहूल धनराज बडगुजर (रा. दिव्या अ‍ॅडलॅब जवळ, त्रिमुर्ती चौक, नवीन नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल बडगुजर यावर नवीन नाशिकसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शहरातील कायदा सुव्यस्थेस बाधा पोहचूनये यासाठी राहूल यास पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केले होते. परंतु तरिही गेल्या काही दिवसांपासून तो शहरात वावरत होता.

तो त्रिमुर्ती चौकात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अनिल दिघोळे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनीट 1 चे पोलीस निरिक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सचीन खैरनार, दिपक गिरमे, महेश कुलकर्णी, पोपट कारवाळ, जाकीर शेख, चंद्रकांत पळीकर यांच्या पथकाने दिव्या अ‍ॅड लॅब परिसरात सापळा रचला होता.

त्यानुसार राहुल त्या परिसरात येताच लपून बसलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी झडप घालून त्यास अटक केली. त्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*