Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

हिमा दासची महिनाभरात ‘पाचवी सुवर्णधाव’

Share

टाबोर : भारताची युवा धावपटू हिमा दासने पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली असून महिन्याभरा तील हे पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.

दरम्यान शनिवारी झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे अंतर अवघ्या ५२.०९ सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेत भारतीय धावपटू असणाऱ्या वी. के. विस्मया, सरिता गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा (५२.४८ सेकंद) व तिसरा (५३.२८सेकंद) क्रमांक मिळविला.

ढिंग एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध झालेल्या हिम दासने गेल्या १५ दिवसांत २०० मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावली असून हिमाने ४०० मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!