टेबलटॉप फोटोग्राफी कार्यशाळा उत्साहात

0

नाशिक : डी. एस.के लाईट अँन्ड शॅडो क्लब आणि शटर बग्ज इन्स्टीटयूट ऑफ फोटोग्राफी यांच्या संयुक्त विद्यमानाने एच. आर. डी. सेंटर येथे कार्यशाळा आयोजित केली गेली.

आंतरराष्ट्रीय टेबलटॉप व इंडस्ट्रीयल फोटोग्राफार विकास शिंदे यांनी टेबलटोॅप फोटो ग्राफी ही अत्यंत क्लीस्ट समजली जाणारी फोटोग्राफी असून त्याबाबत विद्यार्थ्यांना  ग्लास, वाईन बाॅटल, ज्वेलरी,  चांदीची भांडी, मसाल्याचे पदार्थ यांची फोटोग्राफी कशी करावी याचे प्रात्यक्षिक शिंदे यांनी दिली.

या कार्यशाळेसाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, कराड, मुंबई, अमरावती,भुसावळ, नागपूर, अहमदनगर, येथील असंख्य प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार यांनी सहभाग नोंदवला.

याकार्यशाळेचे उद्घाटन ओंल इंडिया महाराष्ट्र लॅब ओनर्स संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे अर्जुन गुप्त व दिलीप माने यांनी केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी. एल.पवार यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*