Type to search

आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

T -20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची शक्यता कमी

Share
नवी दिल्ली : पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकपचा महासंग्राम होणार आहे. क्रिकेटच्या या रणमैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांची ‘लढाई’ अनुभवता येईल, अशी आशा बाळगून असलेल्या दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची आयसीसीनं घोर निराशा केली आहे. हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांत खेळणार आहेत. त्यामुळं साखळी फेरी पार केल्यानंतरच हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहणाऱ्या दोन्ही देशातील असंख्य चाहत्यांना आयसीसीने थोडं निराश केलं आहे. आयसीसीने मंगळवारी (29 जानेवारी) 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर केला.

भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील उत्तम 8 संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट खेळणार आहेत. या राऊंडमध्ये खेळणाऱ्या 12 संघांना दोन ग्रुपमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. आता मुद्दा हा आहे की, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत. यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यापर्यंत (सेमीफायनल आणि फायनल) वाट पाहावी लागणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत या दोन्ही संघांना एकाच गटात खेळवलं जाणार नाही. त्यामुळं साखळी फेरीत हे दोन्ही संघ भिडणार नाहीत. विशेष म्हणजे, २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सामने खेळतील. पण ठिकाण आणि सामन्यांची वेळ वेगवेगळी असणार आहे. सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे. तर याच दिवशी पर्थमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!