#SIP : एसआयपी : हमी देणारी गुंतवणूक

0

शेअर बाजारात गुंतवणूकीच्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषत: एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारातील गुंतवणूकीचा अनुभव तरुण पिढी घेत आहेत. परिणामी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या दहा बारा वर्षांपासून आर्बिटेझ फंड बाजारात असूनही खरेदीदारांनी अपेक्षेप्रमाणे गुंतवणूक केलेली दिसून येत नाही. आर्बिटेझ फंड हा इक्विटी योजनेतला प्रकार आहे. या फंडातून शेअर बाजारातील विविध स्टॉकमधून मिळणारा नफा गुंतवणूकदारांना दिला जातो. असे अनेक फायदे गुंतवणूकदारांना मिळतात.

अस्थिर बाजारात कमी जोखीम : बाजारात सातत्याने चढउतार असल्याने फार कमी गुंतवणूकदार टिकून राहतात. मात्र बाजारातील चढउतार हा गुंतवणुकदाराला गुंतवणूकीची संधी उपलब्ध करून देत असतो. या माध्यमातून आर्बिटेझ फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी वारंवार निर्माण होते. या फंडातील गूंतवणुक किमान जोखमीवर आधारलेली असते. या फंडमधील गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना फारसा आर्थिक झटका बसू देत नाही. ग्राहकांची गुंतवणूक कमी न होता ती स्थीर ठेवून त्यात वृद्धी कशी होईल, यावर आर्बिटेझ फंड काम करत असते.

इक्विटी कर सवलतीचा फायदा: आर्बिटेझ फंडमधील गूंतवणुक खरेदीदारांना कर सवलतीचे फायदे देणारी असते. एक वर्षापेक्षा अधिक काळ गूंतवणुक सुरू ठेवल्यास कर सवलतीच्या लाभ घेता येतो. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा असेल आणि त्यापासून करसवलत मिळवायची असेल तर आर्बिटेझ फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. कमी जोखमीच्या आर्बिटेझ फंडच्या अनेक योजना असून त्यात गुंतवणूक करून बाजारात गुंतवणूकीचा अनुभव घेता येतो.

अपेक्षित परतावा : आर्बिटेझ फंडमधून गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षाअधिक परतावा मिळत नसला तरी सात ते आठ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. गूंतवणुकदाराचा कोणतेही नुकसान फंड करत नाही. गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याबरोबरच बँकेतील मुदत ठेवीपेक्षा अधिक व्याज पदरात टाकतो. बाजारातील नफा गुंतवणूकदारांना दिला जात असल्याने कर सवलत देणार्‍या योजनेप्रमाणे परतावा मिळतो.

कमी कालावधीसाठी गुंतवणूक : जर तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर आर्बिटेझफंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अन्य योजनांतून चांगला परतावा मिळण्यासाठी किमान एक वर्षे तरी वाट पाहवी लागते. मात्र आर्बिटेझ योजनेत कमीत कमी एक वर्ष थांबून बाहेर पडता येते आणि गरजेच्या वेळी पैसा वापरता येतो.

LEAVE A REPLY

*