Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

सिम्बायोसिसचे दोन प्राध्यापक निलंबित,एक सक्तीच्या रजेवर

Share

पुणे : ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर सिंबायोसिस अभिमत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे. विमाननगर येथील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) विजय शेलार व सुहास गटणे या दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. अंतर्गत तक्रार समितीच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सिंम्बायोसिसमधील सेंटर फॉर मिडिया ऍण्ड कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या काही आजी-माजी विद्यार्थ्यांनी मी-टूवर व्यक्त होत प्राध्यापकांकडून लैंगिक छळ झाला असल्याचा आरोप केला होता. सिंम्बायोसिसने याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. यासंदर्भात सिंम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी विद्यापीठाने नेमलेल्या समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन प्राध्यापकांना निलंबीत केले. तसेच एका प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

समितीचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल,’ असे सिंबायोसिसच्या उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!