देेवठाणमध्ये आणखी एकाचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू

0

देवठाण (वार्ताहर) – अकोले तालुक्यातील देवठाण येथील कारभारी भीमाजी बोडके (वय-62) यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी ठरला आहे. मागील आठवड्यात अकोले तालुक्यातील वरखडवाडी (देवठाण) शिवनाथ खेमा पथवे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालेला आहे. या घटनेला आठ दिवस लोटत नाही, तोच पुन्हा एकाचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेल्याने परिसरात घबराटीचे (पान 8 वर)वातावरण निर्माण झालेले आहे.

कारभारी भीमाजी बोडके (वय-62) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सुरुवातीला अकोलेेतील रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. देवठाण सोसायटीचे अध्यक्ष भास्करराव बोडके यांचे ते बंधू होत. अकोले तालुक्यात स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने घराघरांमध्ये जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करावी, अशी मागणी उपसरपंच खेमा पथवे यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*