स्वाईन फ्लूचे जिल्ह्यात 21 बळी

0

48 जणांना झाली लागण

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात जानेवारी ते 18 मे अखेर स्वाईन फ्लूने बळी गेलेल्या रुग्णांची संख्या 21 वर पोहचली आहे. 48 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह अन्य सरकारी आरोग्य संस्थांनी 49 हजार 32 रुग्णांची तपासणी केली असून यात 48 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले आहेत.
जानेवारी 2017 पासून राज्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. यात नगर जिल्हा अपवाद ठरलेला नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या साथरोग निवारण विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर संशयित स्वाईन फ्ल्यू रुग्णाची स्क्रिनिंग करण्यासाठी सेंटर सुरू केले आहे.

तालुकानिहाय मृत्यू
नगर 1, कर्जत 1, कोपरगाव 3, नेवासा 3, पारनेर 2, राहाता 3, संगमनेर 4 आणि श्रीरामपूर 4 यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*