पुणतांब्यात स्वाईन फ्लूने शेतकर्‍याचा मृत्यू

0

पुणतांबा (वार्ताहर)- स्वाईन फ्लूमुळे प्रगतिशील शेतकरी शंकरराव बोरबणे यांचा मृत्यू झाला असा नाशिक येथील रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण थोरात यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता या वृत्तास दुजोरा दिला. खबरदारी म्हणून बोरबणे यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

कै. बोरबणे यांना त्रास झाल्यानंतर उपचारासाठी नाशिक येथील रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असतांना काही नमुनेे तपासणीसाठी घेण्यात आले होते व त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यांच्या तपासणीच्या अहवाल आल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुणतांबा ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण थोरात यांनी बोरबणे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राथमिक स्वरूपातील उपचार सुरू केले आहे. असे दै. सार्वमतशी बोलताना स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

*