शिक्षक पत्नीचा स्वाईन फ्लूने मृत्यू

0

संगमनेर तालुक्यातील दुसरा बळी

संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यात वाढते साथीचे आजारामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले असून तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी गेला आहे. आश्‍वी बुद्रूक नंतर संगमनेरात एका महिलेचा स्वाईन फ्ल्यूने उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

साथीच्या आजारांनी थैमान मांडले असताना शासकीय वैद्यकीय यंत्रणेने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे. शहरातील सह्याद्री विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत सर्जेराव माघाडे यांच्या पत्नी सुरेखा श्रीकांत माघाडे (वय 43) यांचे सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
सुरेखा माघाडे या स्वभावाने अत्यंत मनमिळावू होत्या.

5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांचे क्लासेस त्या घेत होत्या. ‘बामसेफ’ या संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांना स्वाईन फ्ल्यू सदृश्य आजाराने घेरले. उपचार सुरु असतांनाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*