दाढ बुद्रूकच्या तरुणाचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू

0
आश्‍वी बुद्रुक (वार्ताहर)- स्वाईन फ्लू सदृश आजाराने दाढ बुद्रुक येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील नयूम खलील शेख (वय 27) या तरुणाला स्वाईन फ्लू सदृश आजाराची लागण झाल्याने त्याच्यावर आश्‍वी येथे प्राथमिक उपचार करून त्यास संगमनेर व नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले होते.
उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यास एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आश्‍वी बुद्रूक येथील पेट्रोल पंपावर कामाला असलेल्या नयमू शेख हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*