पवळे येथे आढळला स्वाईनफ्लूचा रूग्ण

0
जवळा (वार्ताहर) – पारनेर तालुक्यातील पळवे येथे गाडिलकर वस्तीवर स्वाईन फ्ल्ूची लागण झालेला रुग्ण आढळल्याने परिसरात साथीच्या रोगांविषयी भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील गाडिलकर वस्तीवरील वंदना विजय गाडिलकर या तीस वर्षीय महिलेस स्वाईन फ्लू या संसर्गजन्य घातक आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर अहमदनगर येथील नोबल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महिलेची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरीय सूत्रांनी दिली. तरी पळवे परिसरात आरोग्य विभागाने विशेष काळजी घेऊन नागरिकांना स्वाईन फ्लू व इतर संसर्गजन्य अजारावरील प्रथमोपचार व त्याविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मागदर्शन व औषध उपचार सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
परिसरात आणखी रुग्ण आढळून येण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरी आरोग्य विभागाने दक्षता घेत लोकांच्या मनातील भीती कमी होईल, आरोग्य विभागाने तातडीने हलचाली करून लोकांना दिलासा देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*