नगरमध्ये स्वाईन फ्लूचा विळखा

0
जिल्ह्यात आतापर्यंत 36 बळी, अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 
अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या आठ दिवसांपासून नगर शहरात मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजारांचा प्रार्दुभाव झालेला आहे. त्यातच शहरात स्वाईन फ्ल्यूचा विळखा घट झाला असून ऐन गणेशोत्सवाच्या काळात स्वाईन फ्ल्यूने डोकेवर काढल्याने दोघांचा बळी गेला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अनेक बड्या रुग्णालयात संशयीत स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाई फ्ल्यूने 36 रुग्णांचा बळी घेतला असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर नगर शहरासह ग्रामीण भागात अचानक साथजन्य आजारांनी डोकेवर काढले आहे. यामुळे सरकारी आरोग्य सेवेसह खासगी रुग्णालयात सध्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चालू वर्षी नगर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दूभाव नेहमी पेक्षा अधिक असल्याचे शासकीय आकडेवारी समोर येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 36 जणांना स्वाईन फ्ल्यूमुळे आपले जीव गमवावे लागले आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतांना दिसत आहे.
नगर शहरात गेल्या आठ दिवसांत संशयी स्वाईन फ्ल्यू बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामुळे शहरातील सर्वच रुग्णालय सध्या हाऊस फुल्ल झालेले दिसत आहेत. यासह पुणे, मुंबई या ठिकाणी देखील नगरच्या रुग्णांना उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांत नगर शहरात चार ते पाच संशयी स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळे असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन गणेशोत्वाच्या काळात स्वाईन फ्ल्यूचा विळखा वाढल्याने गर्दी ठिकाणी जाण्यास नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संगमनेर, राहुरी, राहाता नेवासा, कोपरगाव या तालुक्यात स्वाईने पिडितांची संख्या अधिक होती. त्यापाठोपाठ नगर शहरातील स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी राहाता तालुक्यातील लोणी खु येथील एका शेतकर्‍यांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. तर पारनेर तालुक्यातील पळवे येथील एक महिला स्वाईन फ्ल्यू गंभीर आजारी असून त्यांच्यावर नगरशहरातील खागसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे श्‍वसन विकार, घसा दुखी, डोकेदुखीच्या रुग्णांनी तातडीने डॉक्टरांची संपर्क साधण्याचे आवाहन सरकारी आरोग्य सेवेकडून करण्यात आले आहे.
………….
शनिवारी नगरमधील बांधकाम व्यावसायिक व भाजपाचे माजी पदाधिकारी अनिल श्रीधर शेवते (वय 48) यांचे निधन झाले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचा दावा उपचार करणार्‍या डॉक्टरांकडून करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या स्वाईनच्या रुग्णामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*