स्वाईन फ्लूचा विळखा; २६ बळी

0
नाशिक | दि.१ प्रतिनिधी- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढत गेल्यानंतर स्वाईन फ्लूची तीव्रता कमी झाली असली तरी बुधवारी (दि.३१) सिन्नर तालुक्यात स्वाईन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यु झाला. या मृत्युने आजपर्यत जिल्ह्यात २६ जणांचे बळी गेले असुन यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे.

१ जानेवारी ते ३१ मे २०१७ या पाच महिन्यांच्या काळात स्वाईन फ्लूमुळे २६ जणांचा मृत्यु झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. यात बहुतांशी रुग्ण उपचाराच्या निमित्ताने नाशिक शहरात आल्यानंतर खाजगी रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मृत्यु पावले आहे.

यात मुळ नाशिक शहरात असलेले ९ जणांचा मृत्यु स्वाईन फ्लूने झाले आहे. गेल्या मे महिन्यात शहरातील स्वाईन फ्लू चे ३८ संशयित रुग्ण आढळून आले होते. यात २३ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात ३१ मे रोजी सिन्नर तालुक्यातील देशवडी पोस्ट पिंपळगाव निपाणी येथील सीमा पुंडलिक बरके यांच्या मृत्युचा समावेश आहे.

एप्रिल महिन्यात ६६ संशयित रुग्णांपैकी ६ जणांचा मृत्यु झाला होता.

LEAVE A REPLY

*