स्वाईन फ्लूने राहात्यात शिक्षकाच्या पत्नीचा मृत्यू

0

राहाता (प्रतिनिधी) – राहाता येथे प्रथमच स्वाईन फ्लूसदृश आजाराने मीना सुभाष डांगे (वय 42) या महिलेचा मृत्यू झाला. आश्‍वी येथे त्यांच्या नातेवाईकांच्या दशक्रियाविधीनिमित्त त्या गेल्या असताना त्यांना स्वाईन फ्ल्यू रुग्ण असलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे स्वाईन फ्ल्युची लागण झाली.

त्यांना सर्दी व खोकला हा त्रास सुरु झाल्याने त्यांनी राहाता येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेतला नंतर शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला उपचार घेतला. त्यानंतर त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान दि. 12 रोजी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा असून पती सुभाष डांगे रयत शिक्षण संस्था, गणेशनगर महाविद्यालयात  उपशिक्षक आहेत.

LEAVE A REPLY

*