नाशिकमधील ९ आदिवासी बहुल तालुक्यांत ‘स्वयंम प्रकल्प’

कुपोषण रोखले जाणार; रोजगारासाठी मिळणार चालना

0
नाशिक | ग्रामीण परीसरातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यातील मुलांना आहारामध्ये अंड्यांचा पुरवठा करणे, कुपोषण रोखणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरिता सन 2017-18 ते 2019-20 या कालावधीत राज्यस्तरीय जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत जिल्ह्यातील दोन एकात्मिक प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात ‘स्वंयम’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक अंतर्गत  दिंडोरी, नाशिक, पेठ, इगतपुरी व त्र्यंबक तालुके आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण अंतर्गत बागलाण, कळवण, सुरगाणा, देवळा याप्रमाणे एकुण 9 आदिवासी बहुल तालुक्यात आदिवासी प्रवर्गातील लाभार्थीसाठी स्वयंरोजगार निर्मिती करणे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, तसेच या माध्यमातून अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण कमी करणे या उद्दिष्टासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, एकात्मिक बालविकास प्रकल्प व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

प्रत्येक तालुक्यात अनुसूचित गावामधून प्राधान्याने भूमिहीन शेतमजूर, अत्यल्प व अल्पभूधारक अशा 417 आदिवासी प्रवर्गातील लाभार्थ्यांना चार आठवड्याचे कोंबड्यांचे सुधारित देशी जातीचे लिंगभेद न केलेले 45 पक्षी तीन टप्प्यात शंभर टक्के  अनुदानावर  वाटप करण्यात येईल.

पक्ष्यांचे परसातील कुक्कुटपालन करणे या पद्धतीने पालनपोषण करुन त्याद्वारे अंडी उत्पादन वाढविणे हे उद्दिष्ट आहे. याकरिता निवड झालेल्या लाभार्थींचे प्रशिक्षण व क्षमतावृद्धी विभागामार्फत करण्यात येईल.

सुधारित देशी जातीच्या कोंबडयांचे एक दिवशी पिलांचे चार आठवड्यापर्यंत संगोपन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक यानुसार नऊ  ‘मदर युनिट’ची स्थापना करण्यात येईल. या मदर युनिटमार्फत प्रत्येकी 417 लाभार्थींना सुधारित देशी जातीचे लिंगभेद न केलेले 45 पक्षी तीन टप्प्यात शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येईल. मदर युनिट स्थापनेकरिता आदिवासी प्रवर्गातील अनुभवी कुक्कुटपालक लाभार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. त्यासाठी इच्छूक लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन विभाग, संबधित पंचायत समिती यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत.

या योजनेत जिल्ह्यातील नऊ तालुक्यात खालीलप्रमाणे क्लस्टर समाविष्ट असून   या गावातील आदिवासी प्रवर्गातील भूमीहीन शेतमजूर, अत्यल्प व अल्पभूधारक, महिला यांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

तालुका कल्स्टर
नाशिक गिरणारे-1, जातेगांव व गिरणारे-2
त्र्यंबकेश्वर हरसूल, ठाणापाडा, चिखलओहोळ, देवडोंगरा, शिरसगांव, गावठा, सावरपाडा, गारमाळ
दिंडोरी ननाशी, वारे, वणी कसबे, चौसाळे, मोहाडी, उमराळे बु. वणी खुर्द, कोचरगांव व तळेगांव (दिंडोरी)
इगतपुरी आवळखेड, काळुस्ते टाकेद बु
पेठ कुळवंडी, कुंभाळे जोगमोडी, आंबे करंजाळी,
कळवण जयदर-1, जयदर-2, कनाशी, तिऱ्हळ मोकभणगी, दळवट
सुरगाणा उंबरठाण, माणी, काठीपाडा, पांगारणे, घाबरी, बुबळी, बोरगांव, पळसन, मनखेड, बाऱ्हे
बागलाण कपालेश्वर, केळझर, देवळा तालुक्यातील खामखेडा, पिंपळगांव खर्डा, पिंपळगांव
देवळा खामखेडा, पिंपळगाव, खर्डा,

 

वरील नऊ तालुक्यातील नमूद व निर्धारित गावातून अनुसूचित क्षेत्रातील पात्र आदिवासी प्रवर्गातील व्यक्तींना संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती यांच्याकडे 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 2017 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी संबंधित तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*