कंगनाच्या मणिकर्णिकातून एक कलाकार बाहेर

0
मुंबई : कंगना रणौत अभिनित मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेचा विषय बनतो आहे. सिनेमातील कंगनाच्या लूकपासून ते सोनू सूदच्या चित्रपट सोडण्यापर्यंत. पण, आता यात अजून एका कारणाची भर पडली असून सोनूनंतर आणखी एका कलाकाराने हा चित्रपट सोडला आहे. सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार स्वाती सेमवाल या अभिनेत्रीने या सिनेमाला रामराम ठोकला आहे.

दरम्यान स्वातीने तिच्या सिनेमातील व्यक्तिरेखेबाबत सविस्तर सांगितलं. पण, चित्रीकरणाचं वेळापत्रकच तिला दिलं गेलं नाही. निर्मात्यांनी स्वातीला १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान तारखांसाठी विचारणा केली होती. पण, अद्याप तिला वेळापत्रकाच्या निश्चिततेबाबत कोणतीही ठोस सूचना देण्यात आलेली नाही. स्वातीची व्यक्तिरेखा छोटी पण, महत्त्वाची आहे. तसंच, दिग्दर्शक कृष, सोनू सूद आणि निर्माते कमल जैन या तिघांमुळे हा चित्रपट स्वीकारल्याचं स्वातीचं म्हणणं आहे. पण, यातील दोन जण आता चित्रपटात नाहीत.

LEAVE A REPLY

*