पालकमंत्री गिरीश महाजन त्र्यंबकेश्वरला कचरा उचलतात तेव्हा..

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

0

त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) ता. १८ : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे आजपासून त्र्यंबकनगरीत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. स्वत: पालकमंत्री गिरीश महाजनांनी साधूसंतांसमवेत थेट कचरा उचलत श्रमदान केले.

स्वच्छ भारत प्रमाणेच स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राज्यात  राबविण्यात येत आहे. त्र्यंबकनगरीतही आज सकाळी या मोहिमेला सुरवात झाली.

स्वच्छता हीच सेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या या विशेष मोहिमेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन,  त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा तृप्ती धारणे,  मुख्यधिकारी डॉ चेतना केरुरे आदी सहभागी झाले आहेत.

सकाळी आठच्या सुमारास या मोहिमेला प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वरचे नगरसेवक, अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह त्र्यंबकेश्वरमधील मान्यवरांचा या मोहिमेत सहभाग होता.

सकाळी अहिल्या घाट परिसर आणि गोदावरी नदीची या मान्यवरांनी स्वत: स्वच्छता केली. पालक मंत्री गिरीश महाजन यांच्यासह साधूं महंतांनाही कचरा आणि गाळाच्या पाट्या वाहून प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचे नागरिकही या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

दरम्यान या मोहिमेसंदर्भात केल्या दोन-तीन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमधे जनजागृतीचे विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यात विविध शाळांच्या वतीने येथे प्रभातफेरीचेही आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*