Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यास्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ; संजय राऊत यांनी भाजपला केले...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ; संजय राऊत यांनी भाजपला केले लक्ष्य

मुंबई | Mumbai

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट भाजपला लक्ष्य केले आहे..

- Advertisement -

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantraveer Savarkar) गौरव यात्राविषयी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपची विचारप्रणाली आणि सावरकरांची विचारप्रणाली यांमधील फरक लक्षात घेत मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (Rashtriya Swayamsevak Sangha) सावरकरांचं हिंदुत्व मान्य नव्हतं, सावरकर पुरोगामी होते; तसेच सावरकर विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे सावरकरांचे विचार आणि संघाचे विचार कसे वेगळे आहेत हे त्यांनी यावेळी दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

लोकप्रियता मिळवण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींच थोतांड; विखे पाटलांनी सुनावले खडेबोल

संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार पुढे कसे नेणार? आम्ही सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारलं. सावरकरांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनाही शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नव्हतं. बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले, असं सांगतानाच सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे. असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

IPL 2023 : आज दुसरा डबल हेडर सामना; ‘या’ संघांमध्ये होणार लढत

सावरकरांनी हिंदुत्वाचा ( Hinduism) विचार देताना पुरोगामी विचार आणि विज्ञानवाद स्वीकारला. भाजप म्हणते, गाय (cow) ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. “गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही”.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का?, असा सवाल उपस्थित करत भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने काढलेली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही केवळ राजकीय अजेंडा आहे असे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या