स्वप्निल जोशीचा ‘मोगरा’ जूनमध्ये फुलणार

0
मुंबई : श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर सई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी,संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा टच देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

“नाजुक नात्यांचा गुंफलेला गजरा…
आयुष्यात प्रत्येकाच्या आता फुलणार मोगरा”

GSEAMS presents मोगरा फुलला
१४ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात. #मोगरा फुलला

LEAVE A REPLY

*