स्वामी समर्थ सेवामार्गाचे गाणगापुरात केंद्र

0
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि त्र्यंबकेश्वर समर्थ गृरुपीठाच्या वतीने गाणगापूर(कर्नाटक) येथे उभारण्यात आलेल्या समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी गाणगापुरात वास्तुशांती तसेच श्री गुरुचरित्र आणि नृसिंहवाडी येथील समर्थ केंद्राचा शिलान्यासचादेखील कार्यक्रम पार पडला.

दिनांक १७ ते २१ मेदरम्यान पाच दिवसीय भरगच्च कार्यक्रम याठिकाणी झाले. यावेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे यांनी विविध पूजाविधीमध्ये सहभागी होऊन उपस्थित भाविकांना संबोधित केले.

यावेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितले की, गाणगापुरात भविष्यात भव्य भक्तनिवास, मोफत अन्नछत्र, समर्थ यात्रोत्सव, भागवत पारायण, विविध समस्यांवर मार्गदर्शन अशा विविध सोयीसुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*