स्वाईन फ्लूने श्रीगोंद्यातील तरुणाचा मृत्यू

0
लिंपणगाव(वार्ताहर) – श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील शेतकरी कुटुंबातील रोहिदास चंद्रकांत इथापे (वय 42) यांचा अखेर स्वाईन फ्लूने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा नगर जिल्ह्यातील या हंगामातील स्वाईन फ्लूचा पहिला बळी आहे. रोहिदास इथापे यांनी सर्दी, खोकला व थंडीताप येताच शिरूर, बेलवंडी येथील खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार घेतले. पण त्यांची प्रकृती आणखीच बिघडत गेली.त्यांना तातडीने पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गेली दहा दिवस तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण काही उपयोग झाला नाही. अखेर काल त्यांनी अखेरचा श्‍वास घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

मयत इथापे यांच्या पश्‍चात पत्नी, आई- वडिल, भाऊ तसेच एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाली असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. तिच्यात सुधारणा झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*