शेवगाव आंदोलनाला हिंसक वळण; हवेत गोळीबार; दोन शेतकरी जखमी

0
शेवगाव (प्रतिनिधी) – ऊस दरवाढीवरून खानापूर येथे सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रु धुरांचा वापर करून हवेत गोळीबार केला. यामध्ये उद्धव मापारी व बाबुराव दुकळे (दोघे रा. तेलवाडी, ता. पैठण) हे दोन शेतकरी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

तालुक्यातील घोटण येथे उसाला 3100 रुपये भाव द्यावा यासाठी सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले होते. हे आंदोलन संपल्यानंतर आज 11 वाजेच्या सुमारास पैठण ते शेवगाव रोडवर खानापूर येथे काही शेतकर्‍यांनी टायर पेटवून आंदोलन केले होते.

या आंदोलनादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे अतिरीक्त पोलीस अधिक्षक घनशाम पाटील हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व आंदोलक चर्चा करत असतांना काहींनी पोलिसांवर दगडफेक केली.

यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आश्रु धुरांचा वापर करत हवेत गोळीबार केला. यामध्ये उद्धव विक्रम मापारी (वय 36) यांच्या छातीच्या उजव्या बाजुला व बाबुराव भानुदास दुकळे (दोघे रा. तेलवाडी, ता. पैठण) यांच्या डाव्या हाताला गोळी चाटून गेली. या दोघांना सुरूवातीला शेवगाव उपजिल्हा रुग्णालयात व नंतर नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन शेवगाव शहरात बंद पाळण्यात आला. तर क्रांती चौकात जि. प. सदस्या हर्षदा काकडे, अ‍ॅड. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला.

उसदरावरून सुरू असलेले आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरूच

LEAVE A REPLY

*