वरखेडा येथे विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा गोंधळ

0
वणी | दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे निफाड तालूक्यातील महिलेच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत रास्ता रोको आंदोलन केले.

पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी पोलिस निरिक्षक अनंत तारगे यांना चांगलेच धारेवर धरले होते.

महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भुमिका घेतल्याने तणावात आणखी भर पडली. मृत महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या महिलेचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

महिलेचे माहेर सायखेडा जवळील बेरवाडी येथील आहे. वणी पोलीस ठाण्यात गोंधळ झाल्यामुळे कळवणचे पोलीस उपअधिक्षक देविदास पाटील ताबडतोब वणीत दाखल झाले आहेत.

या घटनेची अधिक माहिती लवकरच..

LEAVE A REPLY

*