उरीमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्या; सुरक्षा दलांकडून नाकाबंदी

0
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील उरी येथे असलेल्या लष्करी तळाजवळ संशयास्पद हालचाली नजरेत पडल्याचे वृत्त आहे. येथील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या मोहरा कॅम्पमध्ये काही संशयास्पद व्यक्तींना पाहिले गेले. त्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमी गोळीबार केला. तसेच परिसराला घेराव घालण्यात आला असून, शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

काल (ता.१०) रात्री लष्कराच्या बेस कँपनजीक संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर गोळीबार सुद्धा झाला होता. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून सुरक्षा दल आणि पोलिसांकडून संयुक्त शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. या दरम्यान दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांकडे कसून चौकशी सुरू आहे.

तीन वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी उरीमधील लष्करी तळावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून पाकिस्तान भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला.

LEAVE A REPLY

*