मनमाड स्थानकावर शुकशुकाट; परिसरातील व्यावसायिकांनी घेतली सुट्टी

0
मनमाड(प्रतिनिधी) | दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे दिल्ली व मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या दौंड, पुणे मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.

त्यामुळे नियमित वर्दळीच्या मनमाड रेल्वे स्थानकावर शुकशुकाट बघावयास मिळत आहे. मात्र सणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकावर शुकशुकाट आहे. धंदाच नसल्याने येथील किरकोळ व्यावसायिकांनी सुट्टी घेतली आहे.

मनमाडमध्ये सर्वच गाड्यांना थांबा आहे, मनमाड रेल्वेवर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. मात्र कालपासून बंद असलेल्या रेल्वेसेवेमुळे त्यांनाही सुट्टी घ्यावी लागली आहे.

LEAVE A REPLY

*