अशोकनगर येथील रेशन व रॉकेल दुकान निलंबित

0

ग्रामस्थांच्या तक्रारींची पुरवठा विभागाकडून दखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील अशोकनगर ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार सुभाष दळवी यांनी सुरभी महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाकडे असलेले स्वस्त धान्य दुकान व किरकोळ रॉकेल दुकान निलंबित केले आहे.
या गटाकडून रॉकेल व धान्याचे वाटप करताना गावातील काही कार्डधारकांना युनिटप्रमाणे माल न देणे, रेशनकार्ड रद्द केलेल्यांच्या नावे रेशन वाटपाची नोंद करणे, तब्बल 10 कार्डधारकांची नावे डबल समाविष्ट करुन त्यांना रेशन वाटप केल्याचे दाखविणे, पावती बिल न देणे याबाबत जिल्हाधिकारी तसेच आ. भाऊसाहेब कांबळे, तहसीलदार सुभाष दळवी यांच्याकडे तक्रार करून दुकानाचा परवाना रद्द करून बचत गटावर ङ्गौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेत श्रीरामपूर तहसीलदार सुभाष दळवी यांनी दुकानाची तपासणी करण्यासाठी पुरवठा विभागातील कारकून पाटोळे, बेलापूरचे मंडल अधिकारी बनकर व निपाणी वडगावचे कामगार तलाठी श्रीमती आदिक यांची नियुक्ती केलेली होती. वरील अधिकार्‍यांनी अशोकनगर येथे येऊन दुकानाची तपासणी केली असता धान्य दुकानात 1 ते 14 प्रकारचे दोष व रॉकेल दुकानात 1 ते 13 प्रकारचे दोष आढळून आले.
यामध्ये दुकानदार वापरत असलेले संदर्भ रजिस्टर अद्ययावत नसून तहसीलदारांची त्यावर स्वाक्षरी नाही. कॅश मेमोवरील पावतीवर सह्या अंगठे घेतलेले नाहीत. हिशोबाच्या कागदपत्रात खाडाखोड केलेली आहे. बिल बुकवर परवाना क्रमांक, युनिट संख्या, कार्ड नंबर नमूद नाही. एका कार्डधारकाचे बीपीएल कार्ड असतानाही अंत्योदय व प्राधान्य या दोन्ही प्रकारचा माल दिलेला आहे. रेशनकार्ड धारकांच्या कार्डावर पावतीप्रमाणे मालाच्या नोंदी झालेल्या नाहीत.
पंचनामा रजिस्टरवर सर्वच दक्षता समितीच्या सदस्यांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. वजन काटा पार्सिंग प्रमाणपत्र तपासणीच्यावेळी उपलब्ध करुन दिलेले नाही. वरील प्रमाणे तपासणीमध्ये आढळून आलेले दोष व त्या अनुषंगाने संबंधित दुकानदारांनी सदर केलेल्या खुलाशावरून दोष क्र. 1, 2, 3, 4, 6, 9, 11 ते 14 बाबत संबंधितांनी दोषानुसार पूर्तता केल्याबाबत पुरावा सादर केलेला नाही.
दोष क्र. 5, 7, 8, 10 हे दोष मान्य नसल्याचे दिसून येते. त्याअर्थी चेअरमन सुरभी महिला बचत गट अशोकनगर यांनी वरील दोषाप्रमाणे पुरावा सादर केलेला नसल्यामुळे व दोष क्र 5, 7, 8, 10 हे मान्य असल्याने सदरच्या स्वस्त धान्य दुकानावर शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांनी सुरभी महिला बचत गट अशोकनगर यांच्यामार्ङ्गत चालविले जात असलेले स्वस्त धान्य दुकान पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केलेले आहे.
तसेच रॉकेल दुकानामध्ये 1 ते 13 दोष आढळून आलेल आहेत. त्यामध्येही संबंधिताने पूर्तता केल्याबाबत पुरावा सादर केलेला नसल्याने सुरभी महिला बचत गटामार्ङ्गत किरकोळ रॉकेल दुकान चालविले जात असलेले रॉकेल विक्री केंद्र पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केलेले आहे. तसेच तहसीलदार सुभाष दळवी यांना दोन्ही दुकानांच्या कार्डधारकांची 100 टक्के कार्ड तपासणी करुन 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

*