Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लहान मुलं पळविणाऱ्या महिलेला केले पोलिसांच्या स्वाधीन

Share

वाडीवऱ्हे | वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे दोन लहान मुलांना पळवून नेत असतांना एका महिलेला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  लहान मुलांना पळवुन नेणारी टोळी फिरत असल्याबाबत अनेक अफवा ऐकण्यास येत असतांनाच आज पाडळी देशमुख येथे एका संशयित महिलेला येथील महिलांनी विचारणा केली. यानंतर ती बोलत नसल्याने तिला या महिलांनी चोपही दिला.

ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. पाडळी देशमुख येथील माजी सरपंच जयराम धांडे यांचा मुलगा सर्वेश जयराम धांडे (वय ३ वर्षे) व पंढरी वारुंगसे यांचा नातु प्रज्वल अंकुश वारुंगसे ( वय ४ वर्षे ) या दोघांना घेऊन जात होती.

याचवेळी ज्ञानेश्वरी बजरंग वारुंगसे हिने सदर महिलेला मुलांना घेऊन जातांना पाहिल्यावर तिला हटकले व आरडा ओरड केली. गावातील महिला व पुरुषांनी तिला मंदिराजवळ नेऊन गावातील महिलांनी अधिक झडती घेतली असता तिच्याकडे माचीस व पावडर आढळुन आली.

ज्या मुलांना सदर महिलेने उचलले होते ते मुलं अनोळखी व्यक्तीकडे गेल्याचे आश्चर्य घरातील महिला व पुरुषांना वाटत असुन तिच्या जवळ असणाऱ्या पावडरने मुलांना गुंगी येऊन सदर महिला मुलांना नेत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सद्यस्थितीत भात सोंगणीचा हंगाम असल्याने घरातील लोक दिवसभर शेतावर असल्याचा गैरफायदा घेऊन मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सदर महिलेचा फोटो सोशीलमीडियावर व्हायरल झाल्यानंतर हीच महिला काल बुधवारी बेलगाव कुर्हे, अस्वली स्टेशन, जानोरी परिसरात अनेकांनी पाहिली असुन तीने काही लहान मुलांना खाऊ, काही पैसे व फुले दिले असल्याचेही अनेकांनी सांगितले.

दरम्यान वाडीवऱ्हे पोलिसांनी सदर महिलेची चौकशी सुरू केली असुन तिला मराठी किंवा हिंदी भाषा समजत नसुन याबाबत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!