Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित नवीन सहा रुग्ण दाखल

कोरोना संशयित नवीन सहा रुग्ण दाखल

तीन मयतांचे अहवाल निगेटिव्ह; एकाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट

जळगाव  – 

जिल्हा रुग्णालयात बुधवारी कोरोना संशयित सहा रुग्णांना दाखल करण्यात आले.  त्यांचे स्वॅब घेवून तपासण्यासाठी धुळ्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तर  सोमवारी मृत्यू झालेल्या तीन मयतांचे कोरोनासंदर्भातील अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

त्यांना इतर आजार होते, हे स्पष्ट झाले आहे. तर मंगळवारी एका मयताचा अहवाल अद्याप बाकी आहे. त्यालाही श्‍वसन व इतर आजार होते, अशी माहिती कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक डॉ.विलास मालकर यांनी दिली.

या रुग्णालयात बुधवारी कोरोनासंदर्भात १५ रुग्णांची तपासणी केली.  त्यातील संशयित सहा रुग्णांना दाखल केले आहे. त्यांच्यासह इतर असे १८ अहवाल प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यातील मेहरुणमधील एकावर उपचार सुरू आहे.

तर सालारनगरातील दुसर्‍या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दोन नमुने प्रयोगशाळेने तपासणीसाठी नाकारले आहेत. आतापर्यंत संशयित १७० रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

त्यातील एकूण संशयित १५६ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या रुग्णालयातील स्क्रिनिंग ओपीडीत बुधवारी ८६ आणि आतापर्यंत एकूण २९८८ जणांची स्क्रिनिंग झाली. आतापर्यंत २८१८ जणांना होम क्वॉरंटाइचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या