Type to search

Breaking News Featured धुळे फिचर्स मुख्य बातम्या

शिंदखेड्यात कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ; तपासणीसाठी धुळ्याला केले रवाना

Share

शिंदखेडा  –

येथे आज एक कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयित रुग्णाला ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून धुळे येथे दाखल करण्यात आले आहे

शहरात कोरोना संशयीत रुग्ण असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने प्रशासनाची प्रशासनाची टीम संशयिताच्या घरी दाखल झाली. मात्र परिवाराचा प्रचंड विरोध झाल्यामुळे रुग्णाला पुढील तपासणीसाठी धुळे रवाना करण्यासाठी प्रशासनाला खूप मेहनत घ्यावी लागली. या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपासून शिंदखेडा शहरात संशयित असल्याची चर्चा होती. शिंदखेडा तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, प्रल्हाद देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण मोरे , वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेखा बोरडे यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली.

तात्काळ सर्व अधिकारी, कर्मचारी हे संशयिताचा घरी दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी संशयिताला होम कोरेनटाईन करण्यात आले असून मी गुजरात हुन आलो आहे, अशी माहिती दिली होती. मात्र दिलेली माहिती ही चुकीची असल्याचा संशय प्रशासनाला आहे.

संशयिताचा संबंध मरकस तबलीगीशी असण्याचा दाट संशय असून या बाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्या नुसार आज प्रशासनाने पुढील तपासणी साठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

मात्र परिवाराने तीव्र विरोध केला असता पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पीएसआय सुशांत वळवी यांनी समज दिल्यानंतर पुढील तपासणी साठी धुळे हिरे वैद्यकीय महाविद्याल येथे पाठवण्यात आले. तर घरातील इतर संशयित 6 सदस्यांना होम कोरेनटाईन करण्यात आले आहे.

सदर संशयित हे मौलाना म्हणून काम करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी इतर बाबतीतही गुप्त माहिती मिळवावी. शिंदखेडा शहरातील आणखीन एकदोन व्यक्ती जमात कार्यक्रमात नेहमी सहभागी होतात. कदाचित तेही निजामुदिन दिल्ली येथे जाऊन आले असावे काय अशीही भीती आजच्या घटनेमुळे शिंदखेडा शहरात सुरू होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!