हॅप्पी बर्थडे जान!, त्यानं सुष्मिताला दिल्या ‘प्रेम’पूर्वक शुभेच्छा

0

मुंबई : वयाच्या अठराव्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या मॉडेल अभिनेत्री सुष्मिताचा आज ४३ वा वाढदिवस. तिचा यंदाचा वाढदिवस खूप खास ठरावा यासाठी तिचा कथित प्रियकर रोहमन शॉल प्रयत्न करत आहे. सुष्मितापेक्षा वयानं १५ वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन शॉलनं सुष्मिताला वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थडे जान! येणारं वर्षे तुझ्यासाठी सुख-समाधानाचं, समुद्धीचं जावं असं म्हणत रोहमननं तिच्यासोबतचा खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतून त्यानं पुन्हा एकदा सुष्मितासमोर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे.

हैदराबादमध्ये १९ नोव्हेंबर १९७५ ला तिचा जन्म झाला. तिच्या आजही बऱ्याच चर्चा होतात. तिने १५ वर्षांची असताना मॉडेलिंग क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. अजुनही सुष्मिता सिंगल आहे, पण २ मुलींना तिने दत्तक घेतले आहे. तिने २००० मध्ये पहिली मुलगी दत्तक घेतली, तिचे नाव रिनी आहे. रिनीनंतर जानेवारी २०१० मध्ये तिने अजून एक मुलगी दत्तक घेतली. तिचे नाव अलीशा ठेवले आहे. अलीशा दत्तक घेताना ३ महिन्यांची होती.

आता सुष्मिता ४२ वर्षांची झाली आहे तर तिचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमनच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चा खोट्या असून आता माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. मी आयुष्याशी ‘रोहमान्स’ (रोमान्स) करत आहे असं ती म्हणाली.

 

LEAVE A REPLY

*