Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही-सुषमा स्वराज

Share

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज (मंगळवार) इंदूर येथे आपल्या आरोग्याचे कारण देत ही घोषणा केली. निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकप्रचारासाठी सुषमा स्वराज मंगळवारी इंदूरमध्ये आल्या होत्या. ‘आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे. पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुषमा स्वराज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवरच्या जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना मदत करण्यास त्या नेहमी पुढे असतात. यासाठी त्यांचे मोठे कौतुकही होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!