Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

#SushmaSwaraj : ….अशी आहे सुषमा आणि स्वराज यांच्या प्रेमविवाहाची कहाणी

Share

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे काल (दि. ०६) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून देशातील नागरिक देखील हळहळ व्यक्त करत आहे.

दरम्यान मूळ हरियाणाच्या असणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक उमदे नेतृत्व आपला गमावल्याची प्रत्येकाची भावना आहे. सुषमा स्वराज यांच्या जीवनातील वेगवगेळ्या पैलूंपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या कुटुंबीयांचा विरोध करीत प्रेमविवाह केला होता. याच संदर्भात त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश

सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ ला हरियाणातील अंबाला येथे झाला. सुषमा स्वराज अतिशय हुशार, निरागस आणि भारतीय राजकारणातील निर्भीड व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चंडीगडमधील पंजाब विद्यापीठाततुन शिक्षण पूर्ण केले. याच ठिकाणी देशातील सर्वात तरुण वकील म्हणून ओळख असणाऱ्या स्वराज कौशल यांच्याशी भेट झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा लग्नाचा विषय आला तर घरच्यांनी विरोध केला. सुषमा स्वराज यांनी घरच्यांना विरोध करत १३ जुलै १९७५ ला प्रेमविवाह केला. यानंतर सुषमा स्वराज यांचे पती ३७ वर्षाचे असतांना मिझोराम चे गव्हर्नर झाले होते. १९९० ते १९९३ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

दरम्यान या विवाहासाठी सुषमा आणि स्वराज यांनी मानसिक त्रास सहन करावा लागला. या काळात मुलींना लग्नासाठी विचारणा होत नव्हती. तसेच वरमुलाचा चेहराही पाहू दिला जात नव्हता. परंतु सुषमा स्वराज यांनी धाडस करीत कुटुंबियांना समजावून सांगत विवाह केला.

सुषमा स्वराज या २५ वर्षाच्या असतांनाच हरियाणाच्या कैबिनेट मंत्री झाल्या. त्यांचे पती देखील १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभा संसद म्हणून होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!