Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

Surgical Strike : ४८ वर्षांनी भारताने पुन्हा पराक्रम घडवला…

Share
पाकव्याप्त भागात प्रवेश करून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले.
नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये पूर्ण युद्धाची घोषणा झाल्यावर पाकिस्तानच्या आत हवाई दलाला पाठवले होते. यांचीच पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली दिसून येत आहे. तब्ब्ल ४८ वर्षाने भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकव्याप्त भागात प्रवेश करून दहशतवाद्यांचे अड्ड्यांवर हल्ला चढवला. दहशतवादास खतपाणी घालणाऱ्या दहशतवाद्यांना पुरेपूर नष्ट करण्यासाठी भारतीय हवाई दलाला नियंत्रण रेषा ओलांडण्याची परवानगी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

वाद नको… शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते… तसेच चर्चेतून समस्यां सोडविल्या जाऊ शकतात, यासाठी भारताने नेहमीच सकारात्मकता दर्शवली होती. पंरतु तरी देखील पाकिस्तान कडून अतिरेकी कारवाया व हल्ले सुरूच ठेवण्यात आले. तसेच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला. पाकिस्तानला धडा शिकवा…पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होऊ लागली होती.

दरम्यान भारतीय लष्कराने हवाई दलाच्या साहाय्याने पाकव्याप्त भागात बॉम्ब हल्ले केले. यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. यानंतर देशभरातून भारतीय लष्कराचे कौतुक करण्यात आले.

आता माघार नाही
परिणाम काहीही होवो नियंत्रण रेषेच्या आत शिरून हल्ला करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला त्यांनी दिला आहे. आपण परिणामांची चिंता न करता मोठी जोखीम घेणारे आहोत हे मोदी यांनी दाखवून दिले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!